डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आयसीसी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशाचा स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय

शारजा इथं आज सुरु झालेल्या महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बांगलादेशानं स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय मिळवला.

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशानं निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून ११९ धावा केल्या. स्कॉटलंडतर्फे सस्किया होर्लेनं ३ बळी घेतले. विजयासाठी १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडला ७  गडी गमावून १०३  धावाच करता आल्या. स्कॉटलंडतर्फे १५ धावात २ बळी मिळवणारी रितू मोनी, सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. 

 

येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.