आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणीस्तान यांच्यात पाकिस्तानात लाहोर इथं लढत होणार आहे. दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात पराभूत झालेला संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघ सध्या गट ब च्या गुणतालिकेत तळाला आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल रावळपिंडी इथं होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघांना याचा प्रत्येकी एक गुण मिळणार आहे.