डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 25, 2025 9:57 AM | ICC Champions Trophy

printer

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तानमधल्या रावळपिंडी इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नजमुल हुसेन शांतोच्या ७७ धावांच्या खेळीमध्ये बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३६ धावा केल्या.प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं ४६ षटकं आणि १ चेंडूत ५ बाद २४० धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलनं ४ बळी घेतले तर रचिन रवींद्रनं सर्वाधिक ११२ धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलला सामनावीर घोषित करण्यात आले. या विजयामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर भारत आणि न्यूझीलंडनं उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. अ गटात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये ,दोन विजयांसह भारत आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी चार गुण आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पुढील सामना 2 मार्च रोजी होणार आहे.