डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

१२ वर्षांनंतर ICC करंडकवर कोरलं भारताचं नाव

आयसीसी चँपिअन्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं काल १२ वर्षानंतर करंडक मिळवला. दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा भारत एकमेव देश ठरला आहे.

 

न्यूझिलंडनं दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. पहिला गडी बाद होण्यापूर्वी शुभमन गील आणि रोहित शर्मानं १०५ धावांची भागीदारी केली.  विजयासाठी श्रेयस, राहुल आणि अक्षर पटेल यांची कामगिरी महत्वाची ठरली. कर्णधार रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं आणि न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला मालिकावीर किताब मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. डॅरिल मिशेलनं ६३धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

 

राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.