डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोर इथं  सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

 

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून ३६२ धावा केल्या. रचिन रवींद्र,  आणि केन विल्यमसन यांनी १७४ धावांची भागीदारी केली. रवींद्रनं १०८ तर विल्यमसननं १०२ धावा केल्या. डॅरिल मिचेल, आणि ग्लैन फिलिप्स यांनी प्रत्येकी ४९ धावांचं योगदान दिलं. 

 

विजयासाठी मोठया लक्ष्याचा पाठलाग करताना, शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या  १९   षटकात   १  बाद   १०६  धावा झाल्या.  

 

या लढतीतल्या विजेत्या संघाचा सामना अंतिम फेरीत रविवारी भारताशी होणार आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला ४ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत गाठली आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंडवर विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं ब गटात अव्वल स्थान पटकावलं आहे.