March 2, 2025 1:52 PM

printer

ICC Champions Trophy: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटचा साखळी सामना

आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार अडीच वाजता सुरू होईल. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे, मात्र या गटात सर्वोच्च स्थानी कोण राहणार, हे या सामन्यातून स्पष्ट होईल. या सामन्यातल्या विजेत्याचा सामना उपांत्य फेरीत मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी होईल, तर पराभूत संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल.

 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेनं काल इंग्लंडवर सात गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि ब गटात पहिल्या स्थानी झेप घेतली.