डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 17, 2025 2:00 PM | ICC

printer

आयसीसीचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांसंदर्भात सुरु असलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी राजीनामा दिला आहे.

 

खान यांच्यावर आपल्या महिला सहकाऱ्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. खान यांनी हे आरोप अमान्य केले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत खान रजेवर असतील असं आयसीसी नं सांगितलं आहे. करीम खान यांच्या गैरहजेरीत  उप अभियोक्ता कार्यालयाचं कामकाज पाहतील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा