February 14, 2025 2:41 PM | Cricket | ICC

printer

आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेत ५३% वाढ

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे या करंडक विजेत्या संघाला २० लाख २४ हजार अमेरिकन डॉलर्सची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत.

 

तर उपविजेत्या संघाला १० लाख १२ हजार अमेरिकन डॉलर्स किमतीची बक्षिसं दिली जातील. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.