अमेरिकेत जॉर्जियातल्या रायडल इथं झालेल्या पात्रता फेरीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतं अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19 विश्वचषकासाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. अर्जुन महेशच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेच्या संघानं पात्रता फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२६ च्या विश्वचषकामधे ४ गटात विभागलेल्या १६ संघाची लढत होणार आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ अगोदरचं पात्र ठरले असून पात्रता फेरीत विजयी झालेल्या संघांमध्ये अफगाणिस्तान, टांझानिया, जपान, स्कॉटलंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
Site Admin | August 16, 2025 8:05 PM
अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19 विश्वचषकासाठीत स्थान