भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका अर्थात इब्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ तीन देशांचा गट नसून तीन खंड, तीन मोठ्या लोकशाही आणि तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जोहान्सबर्ग इथं जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या इब्साच्या बैठकीत ते बोलत होते. हे तीन देश एकमेकांच्या विकासाला पूरक ठरतील आणि शाश्वत विकासाचं उदाहरण निर्माण करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत इब्सा, डिजिटल नवोन्मेष आघाडीचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी ठेवला. या बैठकीचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सीरील रामाफोसा यांनी भूषवलं. प्रधानमंत्री मोदी यांच्यासह ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनसियो लुला दी सिल्वा हेही या बैठकीत उपस्थित होते.
Site Admin | November 23, 2025 8:17 PM | ibsa
इब्सा हा त्रिपक्षीय मंच तीन खंड, तीन मोठ्या लोकशाही आणि तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे- प्रधानमंत्री