प्रगत प्रोसेसर सह-विकसित करण्यासाठी आयबीएम आणि एल अँड टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात करार

आधुनिक उपकरणं, संकरीत तंत्रज्ञान प्रणाली, गतिशीलता, उद्योग, ऊर्जा आणि सर्व्हर सारख्या क्षेत्रात प्रगत प्रोसेसर सह-विकसित करण्यासाठी आयबीएम आणि एल अँड टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात काल करार झाला. केंद्रीय  माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ही भागीदारी जागतिक बाजारपेठांसाठी स्पर्धात्मक उत्पादने तयार करून भारताच्या सेमीकंडक्टर क्षमतांना चालना देईल, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.