October 7, 2024 1:53 PM | IAF

printer

भारतीय हवाई दलाकडून चेन्नईमध्ये हवाई प्रात्यक्षिकेचं सादरीकरण

 

हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त काल चेन्नईत विमानांची प्रात्यक्षिकं पहायला गेलेल्या ५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तमिळनाडूचे आरोग्य आणि कुटुम्बकल्याण मंत्री एम सुब्रमणियन यांनी आज चेन्नईत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी ४० रुग्णवाहिकांची सुविधा आणि तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध असतानाही दुर्दैवाने ही दुर्घटना झाली असं ते म्हणाले. प्रेक्षकांनी उन्हापासून संरक्षणासाठी पुरेशी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं होतं. असं त्यांनी सांगितलं.

 

या प्रात्यक्षिकांच्या वेळी व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याची टीका माहिती आणि प्रसारण मंत्री एल मुरुगन यांनी केली आहे. तिरुनेलवेल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. द्रमुक सरकारला या कार्यक्रमाचं आयोजन करता आलं नाही असं ते म्हणाले. या सरकारच्या काळात तमिळनाडूमधे अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे असा आरोपही त्यांनी केला.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.