डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज राज्यात, प्रामुख्यानं मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमधे पालकमंत्री गिरीश महाजन, हिंगोलीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे; तर हिंगोलीतही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार होणार आहे. परभणी जिल्ह्यात पेडगांव इथं मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.