मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात १०७ वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशात, वीरांना अभिवादन केलं. मराठी अस्मितेसाठी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या गौरवशाली महाराष्ट्राचा पाया ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
Site Admin | November 21, 2025 3:27 PM | Hutatma Smruti Din
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन