कॅरेबिअन द्वीप समुहातल्या जमैका, हैती तसंच क्युबा बेटावर येऊन गेलेल्या मेलीसा चक्रीवादळामुळं सुमारे ५० जणांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या या वादळामुळं जमैका बेट परिसरात प्रचंड नुकसान झालं असून ६० टक्क्याहून अधिक भागातला वीज पुरवठा आणि ५० टक्क्याहून अधिक भागातला पाणीपुरवठा खंडित झाला आहे. हैती बेटावर ३१ जणांचा बळी गेला असून २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. क्युबा बेटावर पूरस्थिती निर्माण झाली असून ७ लाख ३५ हजाराहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. या बेटांवर हाहाकार माजवून हे वादळ आता पुढे सरकलं आहे.