डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 14, 2024 7:09 PM

printer

कच्च्या खाद्य तेलावर २० टक्के आणि सूर्यफुलाच्या तेलावर ३२ टक्के आयात शुल्क लागू

केंद्र सरकारनं कच्च्या  खाद्य तेलावर २० टक्के आणि सूर्यफुलाच्या तेलावर ३२ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या तेलांवर या पुढे ३५ टक्के आयात शुल्क द्यावं लागणार आहे. या बरोबरच अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्यावर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरचं किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे. 

 

या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. यानिर्णयाचा फायदा अप्रत्यक्षपणे कापूस उत्पादकांना होईल असं फडणवीस यांनी नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितलं. 

 

भारतीय किसान संघने आयात शुल्क वाढवण्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तेलबिया उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनला ६ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.