बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून हॉल तिकिट डाऊनलोड करता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून    बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणे बंधनकारक असल्याची माहिती माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.