डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हावडा – मुंबई एक्सप्रेसला अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, २४ जण जखमी

हावडा – मुंबई एक्सप्रेसला झारखंड इथं झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. इथलं बचावकार्य पूर्ण झालं असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना पाच लाख आणि जखमी प्रवाशांना एक लाख रुपये मदत रेल्वेने जाहीर केली आहे. या अपघातामुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या टाटानगर – चक्रधरपूर विभागाची रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. तसंच लांब पल्ल्याच्या अकरा गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १७ गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या.

 

रेल्वेनं अनेक मदत क्रमांक जाहीर केले आहेत. मुंबईसाठी ०२२-२२-६९-४०-४० या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.