हाँगकाँग २०२५ च्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. ऑलम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूचा भारताच्या वतीनं पहिला सामना डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफर बरोबर खेळणार आहे.
भारताच्या एच.एस.प्रणोय आणि आयुष शेट्टीसह पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन सहभागी होणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचीही निवड करण्यात आली आहे.