डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हॉंगकाँग वेधशाळेचा दुसऱ्यांदा कृष्ण वादळाचा इशारा जारी

हॉंगकाँग वेधशाळेनं आज आठवड्यात दुसऱ्यांदा कृष्ण वादळाचा इशारा जारी केला आहे. या वादळामुळे जोरदार वारे वाहण्याची तसंच ताशी ७० मिलीमीटरहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्व् भूमीवर हॉंगकाँगच्या गृह व्यवहार  मंत्रालयानं आपत्कालीन समन्वय केंद्र कार्यान्वित केलं आहे. या वादळामुळे सार्वजनिक सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.