बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत.
हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.