डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 20, 2024 7:58 PM | Amit Shah

printer

मार्च २०२६पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट्य – गृहमंत्री अमित शहा

 

झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात भाजपाच्या परिवर्तन यात्रेची सुरवात आज गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भोगनाडीहपासून संथाल परगणा प्रभागापर्यंतच्या या यात्रेनं राज्यातला निवडणूक प्रचार सुरु झाल्याचं गृहमंत्र्यांनी पोलीस लाईन मैदानावरच्या जनसभेला संबोधित करताना सांगितलं.

 

झारखंडमधे भाजपाची सत्ता आली तर ७५ वर्षे किंवा अधिक वयाच्या माणसांना दहा लाखांपर्यंत निःशुल्क सुविधा मिळेल असंही ते म्हणाले.झारखंड सरकार मतांसाठी घुसखोरांचा बचाव करत असल्याचा आरोप शाह यांनी गिरीडोह इथल्या सभेत केला.