डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त २४ ऑक्टोबरला सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि तिरंगा फडकवावा – गृह मंत्रालय

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त येत्या २४ ऑक्टोबरला, केंद्र सरकारचे सर्व विभाग, राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व प्रमुख कार्यालयीन इमारतींवर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवावा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत. मात्र राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालयाची इमारत, देशभरातली उच्च न्यायालयं, राजभवन, राज निवास किंवा विधानपरिषद आणि विधानसभेच्या इमारतींवर संयुक्त राष्ट्राचा ध्वज फडकवू नये, असं मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहे.