August 20, 2025 3:21 PM | Hockey World Cup

printer

पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ जाहीर

येत्या २९ ऑगस्टपासून बिहार इथे होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ आज जाहीर झाला. हरमनप्रीत सिंग हे संघाचे कर्णधार असणार आहेत. पुढच्या वर्षी हॉकी विश्व चषक स्पर्धा बेल्जीयम नेदरलँड इथे होणार आहेत. त्याची पात्रता फेरी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जपान,चीन, कझाकस्तान हे अन्य स्पर्धक असून २९ तारखेला  भारताचा मुकाबला चीनशी होणार आहे. ३१ ऑगस्टला जपानशी आणि १ सप्टेंबरला कझागस्थानशी भारतीय संघ लढेल. ७ सप्टेंबरला स्पर्धेची सांगता होईल.