भारतासाठी हॉकीमध्ये दोनवेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतानं बेल्जियमविरुद्धच्या FIH प्रो लीग सामन्यात ४-३ असा विजय मिळवत आपला हंगाम संपवला, त्यानंतर लगेचच ललितने समाजमाध्यमावर सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.
ललित उपाध्यायनं भारतासाठी १८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ६७ गोल केले आहेत. २०१४ च्या हॉकी विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या ललितनं टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकलं आहे. भारतीय हॉकीमधल्या योगदानाबद्दल ललितला २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.