डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत आज महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी चेन्नई इथं चार वाजता हा सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत, तमिळनाडूनं चंदीगडचा 3-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत, महाराष्ट्राने ओडिशाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. दरम्यान, महिलांच्या गटात आज अंतिम सामना ओडिशा आणि पंजाब यांच्यात होणार असून, चेन्नईमध्ये आज दुपारी दोन वाजता हा सामना होईल. पहिल्या उपांत्य फेरीत, ओडिशानं तमिळनाडूचा 4-1 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पंजाबनं हरियाणाविरुद्ध 3-2 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा