December 5, 2025 8:35 PM | hocky

printer

JWC 2025: भारताची आयर्लंडवर ४-० अशी मात

महिलांच्या एफआयएच हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारतानं क गटातल्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडवर ४-० अशी मात केली. पूर्णिमा यादव हिचे दोन गोल्स आणि कनिका सिवाच आणि साक्षी राणा यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकून क गटात पहिलं स्थान मिळवलं. भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता, उपांत्य फेरीत भारताला स्थान मिळणार की नाही, हे राहिलेल्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे.