FIH हॉकी प्रो लीग 2024-25 अंतर्गत युरोपियन लेगसाठी हॉकी संघटनेच्यावतीनं काल 24 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर करण्यात आला.
पुढील महिन्यात, 7 ते 22 जून या कालावधीत नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन आणि बेल्जियममधील अँटवर्प इथं या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. हरमनप्रीत सिंग कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करेल तर हार्दिक सिंग याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.