महिला हॉकीमधे भारत-ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 1-0 असा विजय मिळवला. उपकर्णधार नवनीत कौरने 21 व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय साकारला. याआधीच्या सर्व चारही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.