डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 10, 2025 3:26 PM | Hockey India

printer

भारतीय हॉकी महिला संघ २६ एप्रिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

भारतीय हॉकी महिला संघ २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या  सुरुवातीला म्हणजे २६ आणि २७ एप्रिल रोजी भारतीय संघाचा सामना   ऑस्ट्रेलियाच्या अ  संघाबरोबर होईल.

 

त्यानंतर १, ३ आणि ४ मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाबरोबर सामने होतील.भारत सध्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेतले  सर्व सामने पर्थ  हॉकी स्टेडियम वर होणार आहेत.