डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 4, 2025 1:30 PM | Hockey

printer

१५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

१५ वी  राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद पुरुष गटाची स्पर्धा आजपासून उत्तरप्रदेशात झाशी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरु होत आहे. मार्चमध्ये झालेल्या महिला वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेप्रमाणेच नवीन विभाग आधारित स्वरुपात ही स्पर्धा होईल. 

 

यामध्ये अ, ब आणि क अशा तीन विभागांत  मिळून ३० संघ सहभागी होणार आहेत. यापैकी ब आणि क विभागाचे सामने आजपासून सुरू होत आहेत. तर अ विभागाचे सामने ८ एप्रिलपासून सुरू होतील. येत्या १५ तारखेपर्यंत स्पर्धा चालेल.