चेन्नई इथं काल रात्री झालेल्या एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, गतविजेत्या जर्मनीनं निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूट-आऊटमध्ये स्पेनचा 3-2 असा पराभव करून आपलं आठवं विजेतेपद पटकावलं. त्यापूर्वी काल, यजमान भारतानं अर्जेंटिनावर 4-2 असा विजय मिळवून कास्यपदक पटकावलं. तर, बेल्जियमनं शूट-आऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-3 असा पराभव करून स्पर्धेत पाचवं स्थान मिळवलं.
Site Admin | December 11, 2025 12:11 PM
एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनी विजयी