भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये वर्ष २०२४-२५ चा पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँड्सविरुद्ध शानदार गोल करून तिने हा पुरस्कार मिळवला.
पुरुषांच्या गटात, बेल्जियमच्या व्हिक्टर वेग्नेझला हा पुरस्कार मिळाला, तर या पुरस्कारासाठी महिला गटात स्पेनच्या पॅट्रिशिया अल्वारेझ ला ही नामांकन मिळालं होतं.