HMP विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर सरकारचं बारकाईनं लक्ष – आरोग्य मंत्रालय

HMP या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगानं वाढत असून केंद्र सरकारचं त्यावर बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आय सी एम आर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येत्या काही दिवसांत देशभरात  एच एम पी  च्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवणार असून वर्षभरात या आजाराचा एकंदर कल आणि प्रकार याचं निरीक्षण करणार असल्याचं  मंत्रालयानं सांगितलं. यासंदर्भातल्या अलिकडच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी  मंत्रालयानं नवी दिल्लीत संयुक्त बैठक घेतली. सध्या तरी भारतात चिंताजनक परिस्थिती नसल्याचं आरोग्य सेवा महासंचालक डॉ अतुल गोयल यांनी या बैठकीत  सांगितलं. या आजाराचा प्रादुर्भाव भारतासह जगभरात सुरु असला तरी भारतात श्वसनासंदर्भातल्या आजारांबाबत योग्य ते उपचार आणि जागरूकता आहे, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.