शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या माओवाद्यांशी चर्चेची शक्यता केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावली आहे. तेलंगण राज्यातल्या निझामाबाद इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. आदिवासी, पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या करणाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी माओवाद्यांना हिंसाचाराचा त्याग करुन देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं.
31 मार्च 2026 पूर्वी भारतातला माओवाद संपवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्याला माओवाद्यांचं आश्रयस्थान बनू देऊ नये असं आवाहन अमित शहा यांनी केलं.