डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री जम्मूमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. येत्या ३ जुलैपासून सुरू होत असलेल्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचाही शाह यांनी या बैठकीत आढावा घेतला. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. शहा यांचं दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यासाठी काल जम्मूमध्ये आगमन झालं. ते आज पूंछला भेट देणार असून तिथं पाकिस्तानच्या गोळीबारामुळे नुकसान झालेल्या लोकांची ते भेट घेणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा