हिंगोली जिल्ह्यात खटकाळी इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला रानभाजी आणि रानफळे महोत्सव नुकताच पार पडला. आसपासच्या गावांतल्या शेतकऱ्यांनी जंगलातून गोळा केलेल्या विविध रानभाज्या आणि रानफळं या प्रदर्शनात मांडली होती. आदिवासी समाजात परंपरेने वापरल्या जाणाऱ्या रानभाज्या आणि फळांचं आरोग्य रक्षणात मोठं योगदान आहे. त्यांचं जतन, संवर्धन तसंच जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
Site Admin | November 23, 2025 7:12 PM
हिंगोली जिल्ह्यात खटकाळी इथे रानभाजी आणि रानफळे महोत्सव