डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवविणार – प्रताप सरनाईक

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातल्या एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला१ कोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.