डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

‘हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं राजभाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. प्रशासनानं लोकांच्या भाषेतच कामकाज करायला हवं, जोपर्यंत व्यक्ती तिच्या स्वतःच्या भाषेत व्यक्त होत नाही तोपर्यंत ती गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर येणार नाही, असं शहा म्हणाले.