हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर

हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६३वर पोहोचली आहे. काल चंबा आणि कांगरा जिल्ह्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती संचालन केंद्रानं दिली. दरडी आणि अचानक आलेल्या पुरामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह राज्यभरातले जवळपास ४०० रस्ते बंद आहेत.