हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगफुटीमुळे पंजाबमध्ये नद्यांची जलपातळी वाढली आहे. सतलज आणि बियास नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. नागरिकांसाठी अन्न, पाणी, औषधे आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रशासनानं सांगितलं. बाधित क्षेत्रांमध्ये राज्य आपत्ती दल आणि वैद्यकीय चमू सज्ज असून नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. पठाणकोट-दलहौजी-छंबा राष्ट्रीय महामार्ग हलक्या वाहनांसाठी सुरु करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
Site Admin | August 14, 2025 2:47 PM
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत