डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

हिमाचल प्रदेशात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा  प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक केंद्रीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. गृहमंत्रालयाच्या पत्रकात ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रुडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था, पुण्याची भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, तसंच आयआयटी इंदोर या संस्थांमधल्या तंज्ञांचा या समितीत समावेश असेल. हिमाचल प्रदेशात कोसळणाऱ्या दरडी, ढगफुटीमुळे अचानक येणारे पूर अशा आपत्तींची त्वरित पाहणी करून नुकसानीचा अंदाज बांधण्यासाठी केंद्र सरकारने याआधीच एक मंत्र्यांची समिती गठीत केली आहे. संकटाच्या काळात केंद्र सरकार हिमाचल प्रदेशच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही शहा यांनी दिली असून आपत्ती पुनर्वसन कामासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.