हिमाचल प्रदेशमध्ये बस अपघातात १४ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये सिरमौर जिल्ह्यात काल झालेल्या बस अपघातातल्या मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी आज सांगितलं. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.