हिमाचल प्रदेशात काल मंडी जिल्ह्यातील तरंगलाजवळ एक बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण जखमी झाले. राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची ही बस सरकाघाटहून दुर्गापूरला जात होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.