हिमाचल प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यात बालूघाट इथं काल संध्याकाळी झालेल्या भूस्खलनात खासगी बसला अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. एक लहान मुलगा बेपत्ता आहे. अपघात झाल्यानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलं होतं. अपघातग्रस्त बसमध्ये ३० प्रवासी होते.
राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.