डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 9, 2025 1:34 PM

printer

हिमाचल प्रदेशात पावसाने झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात संततधार पावसाने झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुलु जिल्ह्यात निरमंड गावात काल रात्री दरड कोसळल्यामुळे दोन घरं कोसळली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

   यंदा मान्सून काळात हिमाचल प्रदेशात १३६ ठिकाणी दरडी कोसळल्या, ९५ ठिकाणांवर पूर तर ४५ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ३७० जणांचा मृत्यू झाला असून ४३४ जण जखमी झाले आहेत, तर ४१ जण बेपत्ता झाले आहेत. राज्यात अद्यापही ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ७४४ रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. या दुर्घटनांमुळे ४ हजार १२२ कोटी रुपयांची वित्तहानी झाली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.