हिमाचल प्रदेशात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. पावसामुळे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ५९८ रस्ते बंद झाले आहेत तसच वीज, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू तर ४६२ जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. काल मध्य रात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. राजधानी मुंबईत जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक संथगतीनं होत आहे. मध्य रेल्वे च्या कुर्ला, आणि पश्चिम रेल्वेच्या बांद्रा स्थानकांजवळ रुळांवर पाणी साचलं होतं.