हिजबुल्लाहचा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर इस्राइलच्या हवाई हल्ल्यात ठार

हिजबुल्लाह चा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर काल इस्राइलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. लेबननची राजधानी बैरुतमध्ये इस्राइलनं काल अनेक हवाई हल्ले केला. त्यात तो ठार झाल्याची माहिती इस्राइलच्या लष्करानं दिली आहे. इस्राइलवर हवाई हल्ले करणं, ड्रोन आणि क्रुझ क्षेपणास्र टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. लेबननमध्ये ड्रोन उत्पादन केंद्र स्थापन केल्याचा आरोप त्याच्यावर होता. 

या संघर्षात हजारो लोक विस्थापित झाले असून अनेक जण सीरियात जाण्याच्या प्रयत्नात आहेत. लेबनन आणि इस्राइलमधले युद्ध वाढलं तर नागरिकांना सुरक्षितरित्या कुठे हलवता येईल याची चाचपणी पाश्चिमात्य देश करत आहेत. सायप्रस आणि तुर्कस्थान ही संभाव्य ठिकाणं असू शकतात. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.