आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारतानं मलेशियावर ४-१ अशी मात केली. पहिल्या क्वार्टरमधली पिछाटी भरून काढत भारतानं सामन्यावरची पकड शेवटपर्यंत टिकवून ठेवली. मनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, शीलानंद लकरा आणि विवेक सागर प्रसाद या चौघांनी प्रत्येकी एक गोल केला. आता भारताचा पुढचा सामना उद्या चीनविरुद्ध होणार आहे.
Site Admin | September 5, 2025 5:00 PM | Hero Asia Cup Hockey Tournament
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर विजय
