September 8, 2024 1:48 PM | South Africa

printer

आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारताकडून मदत

झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारतानं अन्नधान्य पाठवलं आहे. झिम्बाब्वेला एक हज़ार मेट्रिक टन तांदूळ, झांबियाला तेराशे मेट्रिक टन मका पाठवला आहे. अल-नीनो मुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या मलावीला एक हज़ार मेट्रिक टन तांदळाची मदत मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.